मुंबई : राज्यातील कृषी विभागातील जवळपास 300 तालुका कृषी अधिकारी आणि उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडलेल्या आहेत. एकनाथ खडसेंनी राजीनामा दिल्यानंतर कृषी खात्यातील बदल्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत.
कृषी विभागातील अधिकारी बदली कधी होणार या चिंतेत असून ऐन खरीपाच्या तोंडावर खरीपाच्या तोंडावर कृषी विभागाच्या कामावर परिणाम होतं आहे. बियाणे वाटप, खते वाटप, पिक विमा योजना, शेतकरी अपघात विमा योजनांची काम रखडल्यामुळं शेतकरी हैराण आहेत. शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी दरवर्षी होणाऱ्या कार्यशाळा ठप्प असून बोगस बियाणे आणि खतांचा अनधिकृत साठा करणाऱ्यांविरोधातील कारवाईही रखडली आहे.