रत्नागिरी : कोकणात पाऊस आता जोर धरू लागला आहे. पालघर परिसरातही पावसाचं आगमन झाल्याने बळीराजा आनंदित झाला आहे. रत्नागिरीमध्ये दिवसभर पाऊस पडल्याने रत्नागिरीकर चांगलेच हैराण झाले. दिवसभर जिल्ह्यात १०३४ मिलीमीटर पाऊसाची नोंद झाली आहे. दक्षिण रत्नागिरीतही मुसळधार पाऊस झालाय आहे
दापोली, खेड, गुहागर, चिपळूण या भागातही दमदार पाऊस झाला. लांजा तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ५४ मिलीमिटर पावसाची नोंद झालीय. जिल्ह्यात सरासरी ३२४ मिलीमीटर पाऊस पडला आहे.
दापोलीत 192 मीमी इतका सर्वाधिक पाऊस पडलाय..तर खेडमध्ये 182 मीमी,गुहागरमध्ये 175, चिपळूणमध्ये 105 मीमी इतक्या पावसाची नोंद झाली तर लांजा तालुक्यात सर्वाधीक कमी म्हणजे 54 मीलीमीटर पावसाची नोंद झाली.