नंदुरबार : जगाच्या पाठीवर कुठेही होत नाही, अशी टोल वसुली नंदुरबार शहरात केली जात आहे. शहरात पेटोल डिझेलवर उपकराच्या माध्यमातून टोलसाठीची वसुली केली जात आहे. याबाबत दावे प्रतिदावे करणारे सत्ताधारी आणि विरोधक मुग गिळून गप्प आहेत.
जगाच्या पाठीवर कुठेच होत नाही अशी पठाणी टोल वसुली नंदुरबार शहरात होतेय. नंदुरबार शहरात दुचाकी चालकांकडून टोल वसुल केला जातोय.. होय शहरातील दुचाकी चालकांकडून अप्रत्यक्ष रित्या जबर टोलची रक्कम वसूल केली जात आहे. 7-8 वर्षांपूर्वी शहरात दोन उड्डाणपुल बांधण्यात आले होते.
खर्चाची रक्कम वसुली करण्यासाठी सुरवातीला शहारच्या वेगवेगळ्या प्रवेशद्वारांवर टोलनाके बसवुन टोलवसुली करण्यात आली. याविरोधात तीव्र जनआंदोलन झाल्यानंतर ही टोल वसुली हटवुन, शहरातील पंपांवरुन होणाऱया पेट्रोल डिझेलवर सेजच्या माध्यमातून टोल वसुली सुरु करण्यात आली.
सध्या पेट्रोलमागे १ रुपये ५ पैसे तर डिझेल वर ८ पैशांची टोल वसुली केली जात आहे. मात्र गंमत अशी की शहरातील १४ पेटोलपंपांवरुन हजारो दुचाकीस्वार पेट्रोल भरत असल्याने त्यांनाही टोलची किंमत मोजवी लागत आहे. त्यामुळेच या साऱया गौडबंगाल विरोधात प्रवासी संघटना न्यायालयीन लढाई लढत आहे.
या उड्डाणपुलांचा प्रकल्प खर्च अवघ्या १४ कोटी होता. मात्र ठेकेदार आणि शासकीय अधिकाऱयांच्या संगणमाताने झालेल्या दिरंगाईने प्रकल्प ५० कोटींच्या घरात गेला, त्यातही गेल्या तीन वर्षात पेट्रोल डिझेलच्या माध्यमातून १५ कोटी रुपयांचा टोल वसूल झाला असून याआधी ठेकेदारामार्फत प्रत्यक्ष टोलनाक्यांवरुन झालेल्या टोलवसुलीचा तर हिशेबच नाही. त्यामुळेच नंदुरबारकरांमध्ये कामालीची नाराजी आहे.
या साऱ्या टोलवसुली बाबत जिल्हा प्रशासन तर अनिभिज्ञच आहे, कारण नेमकी महिन्याकाठी पेट्रोल-डिझेल विक्रीतून किती टोल वसुली होती याची साधी त्यांना माहितीही नाही. जिल्ह्यात डॉ विजयकुमार गावित आणि अड पद्माकर वळवी सारखे दिग्गज नेते या पठाणी वसुलीबाबत फक्त आश्वासनाचे फौवारेच उडवताय ,हे अजून लाजिरवाणे म्हणावे लागेल. या पठाणी टोल वसुलीतून आपली मुक्तता व्हावी एवढीच मागणी नंदुरबारकर करतायत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.