अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरील दरड हटवण्याचं काम आजपासून सुरू होणार आहे. हे काम पुढील आठवडाभर सुरू राहणार आहे. त्यामुळं या मार्गावरून नेहमी प्रवास करणाऱ्यांचे हाल होणार आहेत. हायवेवर होणारा खोळंबा टाळण्यासाठी अनेकांची पाऊलं आपसूक रेल्वे स्टेशनकडे वळलीयेत.
एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक जुन्या मुंबई-पुणे हायवेवर वळवण्यात आलीये. मुंबई-पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या हलक्या वाहनांनी जुन्या मुंबई-पुणे महामार्गाचा वापर करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलंय. तर अवजड वाहनांची वाहतूक दुपारी १२ ते ४ दरम्यान दुरूस्ती कामांच्या आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्यानं मंदगतीनं अथवा बंद करून एक्स्प्रेस मार्गावरून सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आलीय.
हे काम २३ जुलैपासून सुरू करण्यात येणार होतं. मात्र सर्व यंत्रणांची जमवाजमव करण्यात वेळ गेल्यानं आता आजपासून हे काम सुरू करण्यात येणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.