आमदार प्रताप सरनाईकांना पुजारी टोळीकडून धमकी

ठाण्याचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना रवी पुजारी टोळीकडून जीवे मारण्याची धमकी येत आहे. त्यामुळे ठाण्यात कायदा सुवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

Updated: Mar 11, 2015, 09:55 PM IST
आमदार प्रताप सरनाईकांना पुजारी टोळीकडून धमकी title=

ठाणे : ठाण्याचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना रवी पुजारी टोळीकडून जीवे मारण्याची धमकी येत आहे. त्यामुळे ठाण्यात कायदा सुवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

गेले १० दिवस सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी येत असल्याचं पत्र सरनाईक यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना लिहीलं आहे. सरनाईक यांच्या कार्यालयातल्या लँडलाईनवर हे धमकीचे फोन येत आहेत. 

फोन कॉलचं रेकॉर्डींगही तपासणीसाठी देण्यात आलं आहे. ठाण्य़ात सध्या अऩेक व्यावसायिकांना रवी पुजारी टोळीकडून खंडणीसाठी फोन येत आहेत. त्यामुळे ठाण्यात व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.