पुण्यात पोलिसांच्या मुलांचे गँगवॉर, भरदिवसा गोळीबार

पुण्यातील कस्तुरी चौकात गँगवॉरमधून फायरिंगची घटना घडलीय. अजय शिंदे नावाच्या गुंडावर प्रतिस्पर्धी नवनाथ लोंढा गँगकडून गोळीबार करण्यात आला. भरदिवसाया हा प्रकार घडल्याने सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.

Updated: Mar 11, 2015, 09:06 PM IST
पुण्यात पोलिसांच्या मुलांचे गँगवॉर, भरदिवसा गोळीबार  title=

पुणे : पुण्यातील कस्तुरी चौकात गँगवॉरमधून फायरिंगची घटना घडलीय. अजय शिंदे नावाच्या गुंडावर प्रतिस्पर्धी नवनाथ लोंढा गँगकडून गोळीबार करण्यात आला. भरदिवसाया हा प्रकार घडल्याने सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.

या हल्ल्यात अजय शिंदेच्या गाडीतील महिला जखमी झाली. याप्रकरणी मार्शलनी पाठलाग करून लोंढा गँगच्या संशयित आरोपीला ताब्यात घेतलं. हे दोन्ही गँगस्टर पोलिसांची मुले आहेत. अजय शिंदे आणि लोंढा या दोघांचेही वडील पोलीस खात्यात कॉन्स्टेबल होते.

पोलीस लाइनमध्ये राहत असतानाच दोघांच्या गुन्हेगारी कृत्यांना सुरूवात झाली. या दोन गँगमधील वैमनस्यातून गेल्यावर्षी कुणाल पोळ याची स्वारगेट भागात हत्या झाली होती. त्या हत्येचा बदला घेण्यासाठी आजचा हल्ला करण्यात आला. मात्र त्यातून गुंड अजय शिंदे बचावला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.