ठाणे महापौरपद निवडणुकीसाठी जोरदार फिल्डींग

ठाणे महानगर पालिकेच्या महापौरपदाची निवडणूक येत्या 10 सप्टेंबर म्हणजेच बुधवारी घेण्यात येणार आहे. यासाठी जोरदार फिल्डींग लावण्यात आली आहे.

Updated: Sep 6, 2014, 03:37 PM IST
ठाणे महापौरपद निवडणुकीसाठी जोरदार फिल्डींग title=

ठाणे : ठाणे महानगर पालिकेच्या महापौरपदाची निवडणूक येत्या 10 सप्टेंबर म्हणजेच बुधवारी घेण्यात येणार आहे. यासाठी जोरदार फिल्डींग लावण्यात आली आहे.

महापौर पदासाठी सेनेतल्या अनेकांनी जोरदार फिल्डींग लावली होती. मात्र, चर्चेत असणाऱ्या नावांना बाजूला सारुन महायुतीनं महापौरपदासाठी संजय मोरे यांना पसंती दिलीये. तर, कळव्यातील नगरसेवक राजेंद्र साप्ते यांनी उपमहापौरपदासाठी आपला अर्ज दाखल केलाय.

दुसरीकडे आघाडीने पक्षीय बलाबलामध्ये तीनने मागे असून पराभवाची शक्यता असतानाही काँग्रेसच्यावतीने महापौर पदासाठी विक्रांत चव्हाण आणि उपमहापौर पदासाठी मेघना हंडोरे यांनी अर्ज दाखल केलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.