कॉपी पकडल्यामुळे शिक्षकाला मारहाण

परीक्षेदरम्यान कॉपी करताना पकडल्याचा राग मनात ठेवून विद्यार्थ्यांनी केंद्र प्रमुखालाच मारहाण केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमधील सांगवी परिसरात घडली आहे.

Updated: Dec 12, 2016, 08:58 PM IST
कॉपी पकडल्यामुळे शिक्षकाला मारहाण title=

औरंगाबाद : परीक्षेदरम्यान कॉपी करताना पकडल्याचा राग मनात ठेवून विद्यार्थ्यांनी केंद्र प्रमुखालाच मारहाण केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमधील सांगवी परिसरात घडली आहे. या मारहाणीत केंद्रप्रमुख डॉ. सुनील पिंपळे यांच्या पायाला जबर दुखापत झाली असून इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी हर्सूल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी इंजिनिरिंगचा पेपर सुरु असताना काही विद्यार्थी कॉपी करत असल्याचं केंद्रप्रमुख सुनिल पिंपळे यांच्या लक्षात आले त्यांनी हे थांबवण्याचा प्रयत्न केले असता कॉलेजच्या संचालिकेनं त्यांना शिविगाळ करून बाहेर हाकलले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

हे सगळं झाल्यानंतर पिंगळे संध्याकाळी पेपरचा गठ्ठा घेवून निघाले असता काही विद्यार्थ्यांनी त्य़ांना रोखले आणि मारहाण केली. काही लोक मदतीला आल्यामुळे कसाबसा जीव वाचला असल्याचं पिंगळेंचं म्हणणं आहे.

याबाबत पिंगळेंनी पोलिसांत तक्रार दाखल केली असली तरी विद्यापीठ प्रशासनानं मात्र यावर अजूनही म्हणावी तशी कारवाई केली नाही. प्राध्यापक संघटनांनी  याबाबत कुलगूरूंची भेट घेत त्या सेंटरवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

या प्रकरणी आता गुन्हा दाखल झाला असला तरी अजून काहीही कारवाई नाही, घटना घडून दोन दिवस उलटले तरी आजही त्या सेंटरवर परिक्षा सुरुच आहे. या परिस्थीतीत प्राध्यापकावर झालेला हल्ला कुणीही गंभीरतेनं घेतला नसल्याचंच दिसत आहे.