मुंबई : ठाण्यातले बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्यावरील मांडलेल्या लक्षवेधीवर विधानसभेत जोरदार खडाजंगी झाली.
भाजप आमदार अनिल गोटे यांनी याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचं नाव घेण्याचा आग्रह केला. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी अखेर जितेंद्र आव्हाड यांचं सभागृहात नाव घेतलं.
मात्र त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नसून या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. तर ठाण्यात गोल्डन आणि सिल्व्हर गँगनं खरच उच्छाद मांडल्याचं शिवसेनेचे ठाण्यातले आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.
त्यावर चौकशी सुरू असून सर्व गँग्सचं कंबरडं मोडून काढण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.