पुणे : कोपर्डी प्रकरणी दोन दिवसात आरोपपत्र दाखल केलं नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरले असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी महिन्याभरात आरोपपत्र दाखल करू असं सांगितलं होतं आता तीन महिने होत आले तरीसुद्धा आरोपपत्र दाखल झालेलं नाही. त्याविषयी सुळेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय कोपर्डीच्या पीडितांना न्याय मिळवून देऊ असंही सुळे यांनी म्हटलं आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला इशारा दिला आहे तर मुख्यमंत्र्यांच्या कारभारावही टीका केली आहे.