नागपूर : राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या पत्नी आमदार सुमनताई पाटील यांनी आज नागपूर विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. राज्यात पुन्हा डान्सबार बंदी लागू करण्याच्या मागणीसाठी त्यांनी हे आंदोलन केलं.
आबा पाटील यांनी राज्यात सर्वप्रथम डान्सबार बंदी केली होती. मात्र न्यायालयाच्या आदेशांमुळे ही बंदी उठली आहे. सरकारनं कायदा करून डान्सबार बंद करावेत, अशी मागणी आता जोर धरतेय तसेच सांगली जिल्ह्यातील मटका बंद करा, दुष्काळी भागासाठी वरदान ठरणारी म्हैसाळ योजना सुरू करावी, दुष्काळी तालुक्यांत पाणीपट्टीची थकबाकी माफ करावी अशा अन्य मागण्या सुमनताई पाटील यांनी यावेळी केल्यात.
पाहा व्हिडिओ