सुभाष भामरेंनी घेतली जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबियांची भेट

पाकिस्तानातून परतलेले जवान चंदू चव्हाण यांच्या कुटुंबियांनी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची भेट घेतली. 

Updated: Jan 23, 2017, 07:50 AM IST
सुभाष भामरेंनी घेतली जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबियांची भेट title=

धुळे : पाकिस्तानातून परतलेले जवान चंदू चव्हाण यांच्या कुटुंबियांनी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची भेट घेतली. 

धुळ्यातील डॉ. भामरेंच्या घरी चंदू चव्हाण यांचे भाऊ भुषण, आजोबा चिंधापाटील आणि इतर नातलग भेटीसाठी गेले. 

चंदू चव्हाण यांच्या पाकिस्तानहून सुटकेनं आनंदीत झालेल्या भूषण यांनी डॉ. भामरे यांचं अभिनंदन केलं तसंच चंदूच्या परिवाराकडून डॉ. भामरेंचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.