आश्चर्य: खासगी शाळा सोडून मुलं जिल्हापरिषदेच्या शाळेत

जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेऐवजी पालक आपल्या पाल्यांना खासगी शाळांमध्ये टाकतात. त्यामुळे बहुतांश मराठी शाळा ओस पडल्याचं चित्र राज्यात पहायला मिळतंय. मात्र आम्ही आज तुम्हाला दाखवणार आहोत नेमकी याच्याउलट चित्र.

Updated: Mar 26, 2017, 09:05 AM IST
आश्चर्य: खासगी शाळा सोडून मुलं जिल्हापरिषदेच्या शाळेत title=

सांगली : जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेऐवजी पालक आपल्या पाल्यांना खासगी शाळांमध्ये टाकतात. त्यामुळे बहुतांश मराठी शाळा ओस पडल्याचं चित्र राज्यात पहायला मिळतंय. मात्र आम्ही आज तुम्हाला दाखवणार आहोत नेमकी याच्याउलट चित्र.

सांगलीतल्या एका जिल्हा परिषदेच्या शाळेनं या भागातल्या खासगी आणि इंग्रजी शाळेतल्या विद्यारथ्यांना अक्षरश: वेड लावलंय. त्यामुळे या खासगी शाळा सोडून मुलं जिल्हापरिषदेच्या शाळेत येऊ लागलेत. ही शाळा आहे सांगली जिल्ह्यातील दुष्काळी ‘दिघंची’ या गावातील.  दिघंची प्राथमिक शाळा ही डिजिटल टॅबलेट शाळा झाली आहे. तंत्रस्नेही शिक्षक सुरज तांबोळी यांनी ज्ञान रचना अभ्यास क्रमावर आधारित वेगवेगळे अॅप तयार केले आहेत, त्याच प्रमाणे वेबसाईड, ब्लॉग सुद्धा त्यांनी बनवले आहेत.

विविध वैशिष्ठेपुर्ण असलेल्या झेड पीच्या शाळेतील मुलांच्या हातात टॅब, लॅपटोप उपलब्ध केले आहेत. शाळेतील सर्व विध्यार्थी हे प्रगत असून, स्कॉलरशिप परीक्षेत येथील विध्यार्थी अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण होत आहेत. एखाद्या नामांकित खासगी शाळेपेक्षा या ठिकाणी दर्जेदार शिक्षण दिल जात आहे. आणि म्हणूनच परिसरातील खासगी शाळेतले विद्यार्थी दिघंचीतल्या जिल्हापरिषदेच्या शाळेत प्रवेश घेऊ लागले आहेत.