लोणावळा : बुडालेल्या चारही विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले

येथील पवना डॅममध्ये बुडालेल्या चारही विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले. काल दुपारी चारच्या सुमारास ताथवडे येथील जेएसपीएम कॉलेजचे नऊ विद्यार्थी फिरण्यासाठी पवना धरणाच्या परिसरात आले होते. त्यावेळी त्यातील आकाश सोनावणे, निकित येवले, शुभम मुळे आणि किरण हुंकारे हे चौघे जण पाण्यात उतरले. 

Updated: Mar 23, 2015, 10:53 PM IST
लोणावळा : बुडालेल्या चारही विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले title=

लोणावळा : येथील पवना डॅममध्ये बुडालेल्या चारही विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले. काल दुपारी चारच्या सुमारास ताथवडे येथील जेएसपीएम कॉलेजचे नऊ विद्यार्थी फिरण्यासाठी पवना धरणाच्या परिसरात आले होते. त्यावेळी त्यातील आकाश सोनावणे, निकित येवले, शुभम मुळे आणि किरण हुंकारे हे चौघे जण पाण्यात उतरले. 

पाण्याचा अंदाज न आल्याने हे चौघेही पाण्यात बुडाले. काल संध्याकाळी यापैकी एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं होतं. अन्य तीन विद्यार्थ्यांचा शोध कालपासून सुरू होता. अखेर आज या तीन विद्यार्थ्यांचे मृतदेह हाती लागलेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.