श्रीहरी अणेंवर औरंगाबादमध्ये हल्ला

विदर्भवादी श्रीहरी अणे यांच्या गाडीवर औरंगाबादेत हल्ला करण्यात आला.

Updated: Mar 24, 2017, 10:34 AM IST
श्रीहरी अणेंवर औरंगाबादमध्ये हल्ला  title=

औरंगाबाद : विदर्भवादी श्रीहरी अणे यांच्या गाडीवर औरंगाबादेत हल्ला करण्यात आला. कार्यक्रमासाठी अणे औरंगाबादेत आले होते. हा कार्यक्रम शिवसैनिकांनी उधळून लावला. अणे येण्यापूर्वीच शिवसैनिकांनी इथे गर्दी केली होती.

अणेंच्या गाडीवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. मोठा फौजफाटा तैनात असतानाही दगडफेक करण्यात आल्यानं अखेर अणेंनी काढता पाय घेतला. तर आयोजकांनीही कार्यक्रम आवरता घेतला. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनीही अणेविरोधात घोषणाबाजी केली. 3 मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.