महाराजांचा सिंधुदुर्ग मोजतोय शेवटचा घटका!

एकीकडे शिवजयंती साजरी होत असताना महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांची अवस्था दयनीय आहे. मालवणच्या समुद्रात बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याची स्थिती वेगळी नाही.

Updated: Feb 19, 2015, 11:22 AM IST
महाराजांचा सिंधुदुर्ग मोजतोय शेवटचा घटका! title=

सिंधुदुर्ग : एकीकडे शिवजयंती साजरी होत असताना महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांची अवस्था दयनीय आहे. मालवणच्या समुद्रात बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याची स्थिती वेगळी नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचं आद्यस्थान म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला... महाराष्ट्राची शान म्हणजे किल्ले सिंधुदुर्ग... महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हा किल्ला बांधला... 

मालवणपासून सुमारे अर्धा मैल समुद्रात 48 एकर क्षेत्रात हा किल्ला गेली साडे तीनशे वर्षे उभा आहे... 52 बुरुज असलेला हा किल्ला कोकणातला अतिशय महत्त्वाचा किल्ला मानला जातो. मात्र, या किल्लाची मोठ्या प्रमाणात पडझड झालीय. गेल्या 10 वर्षांत किल्ल्याचे अनेक बुरुज ढासळलेत. किल्ल्यावर होडी वाहतूक सुरू असते मात्र त्यातही सुसूत्रता नाही. सोयी सुविधांचाही किल्ल्यावर मोठा अभाव दिसून येतो. सरकारच्या दुर्लक्षामुळे किल्ल्याच्या दुरवस्थेत आणखीनच भर पडतेय.  
 
शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण केलं जातं तर समुद्रात शिवस्मारक उभारण्याचाही खटाटोप सुरू आहे. मात्र शिवरायांनी स्वत: बांधलेला हा किल्ला शेवटच्या घटका मोजतोय. त्यामुळे स्मारकं उभारण्यापेक्षा खरी गरज आहे ती खरी खुरी स्मारकं जपण्याची... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.