सिंहस्थ कुंभमेळा तयारी अंतिम टप्यात

सिंहस्थ कुंभमेळा तयारी अंतिम टप्यात आलीय. याच पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यबंकेश्वरच्या ध्वजारोहणासाठी प्रशासन सज्ज झालंय. 

Updated: Jul 13, 2015, 04:50 PM IST
सिंहस्थ कुंभमेळा तयारी अंतिम टप्यात  title=

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा तयारी अंतिम टप्यात आलीय. याच पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यबंकेश्वरच्या ध्वजारोहणासाठी प्रशासन सज्ज झालंय. 

मंगळवारी सकाळी 6 वाजून 16 मिनिटांनी नाशिकमध्ये तर 6 वाजून 30 मिनिटांनी त्र्यबंकेश्वरमधे ध्वजारोहण पुरोहित संघाचे ध्वजारोहण होणार आहे. 

नाशिकचा ध्वज कापडी केशरी रंगाचा आहे तर त्र्यंबकेश्वरचा ध्वज ताम्र पटापासून तयार करण्यात आलाय. 180 किलो वजनाच्या आणि 31 फूट उंचीच्या ध्वज स्तंभावर 50 किलो वजनाची ताम्रपटाची ध्वज पताका तयार करण्यात आलीय.

याचं नक्षीकाम गुजरातमधे नक्षीकाम आलं असून सूर्य, चंद्र, गुरू यांच्यासह सिंह, मगर यांचे प्रतीक पितळ धातूपासून नटवण्यात आलेले आहेत. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये शोभायात्रा काढण्यात येणार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.