राज ठाकरे यांनी मराठवाड्यातून लढावे – बाळा नांदगावकर

मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अनुशेष बाकी आहे. शिवाय या भागात मोठ्या प्रमाणात मागासलेपण आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी मराठवाड्यातून विधानसभा निवडणूक लढवावी असे मत आज मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी जालन्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

Updated: Jul 17, 2014, 06:59 PM IST
राज ठाकरे यांनी मराठवाड्यातून लढावे – बाळा नांदगावकर  title=
सौजन्य - डीएनए

जालना : मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अनुशेष बाकी आहे. शिवाय या भागात मोठ्या प्रमाणात मागासलेपण आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी मराठवाड्यातून विधानसभा निवडणूक लढवावी असे मत आज मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी जालन्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

याशिवाय आपण राज ठाकरे यांच्याकडे आपण अशी इच्छाही व्यक्त करणार असल्याच नांदगावकर यांनी सांगितले.

यावेळी नांदगावकर यांनी बालहक्क आयोगाने गोविंदांसंदर्भात घेतलेल्या निर्णयाचेही स्वागत केले.मात्र आयोगाने सर्वांना विचारात घेऊन हा निर्णय घेतला असता तर बरं झाल असते असे मतही त्यांनी नोंदवले.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.