शिवसेना पनवेल महापालिका निवडणूक स्वतंत्र लढणार

शिवसेना - भाजप युती मोडल्यानंतर विधानसभा निवडणुकीनंतर महापालिका निवडणुकीत शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला आणि निवडणूक लढविली. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 26, 2017, 09:12 PM IST
शिवसेना पनवेल महापालिका निवडणूक स्वतंत्र लढणार title=

नवी मुंबई : शिवसेना - भाजप युती मोडल्यानंतर विधानसभा निवडणुकीनंतर महापालिका निवडणुकीत शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला आणि निवडणूक लढविली. आता नव्याने होणाऱ्या पनवेल महापालिका निवडणुकीत शिवसेनेने स्वबळावर लढण्याचे जवळपास निश्चित केले आहे.

शिवसेना-भाजपची युती होणार नसल्याचंही सूत्रांनी स्पष्ट केले आहे. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार सुनील प्रभू आणि आदेश बांदेकर यांच्यासह १० आमदारांवर निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. 

शिवाय प्रचारादरम्यान पनवेलमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः सभाही घेणार आहेत. येत्या 24 मे रोजी पनवेल, भिवंडी आणि मालेगाव महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे पनवेलमध्ये शिवसेना काय जादू करणार याची उत्सुकता आहे.