बदलापूरच्या शिवसेना नगरसेवकावर हल्ला

कुळगांव बदलापूर शिवसेना नगरसेवकावर शुक्रवारी दोन जणांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे.

Updated: Dec 11, 2016, 06:54 PM IST
बदलापूरच्या शिवसेना नगरसेवकावर हल्ला  title=

बदलापूर : कुळगांव बदलापूर शिवसेना नगरसेवकावर शुक्रवारी दोन जणांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. शिवसेना नगरसेवक शशिकांत पातकर हे आपल्या प्रभागातील विकासकामाची पाहणी करण्यासाठी गेले असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.

नगरसेवक शशिकांत पातकर यांनी त्यांची फॉर्च्युनर गाडी जयेश राऊत यांना दिली होती. समीर पाटील आणि आशिष काजळे यांनी आमच्या विरोधकासोबत का राहतो याचा राग मनात धरून पातकर यांच्यावर चाकूने हल्ला केला. पातकर यांच्या फिर्यादीवरून याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात समीर पाटील व आशिष काजळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.