पिंपरी चिंचवडमध्ये कॅशलेस व्यवहारांना सुरुवात

नोट बंदीच्या निर्णयामुळं लोकांना प्रचंड त्रास होतोय अशी ओरड केली जात आहे. त्यात काही प्रमाणात तथ्यही आहे. पण या बदलाला लोक सामोरं जाऊ लागलेत. किमान शहरात तरी तसं चित्रं दिसतंय. पिंपरी चिंचवड शहर ही त्याला अपवाद नाही.

Updated: Dec 11, 2016, 04:54 PM IST
पिंपरी चिंचवडमध्ये कॅशलेस व्यवहारांना सुरुवात title=

पिंपरी-चिंचवड : नोट बंदीच्या निर्णयामुळं लोकांना प्रचंड त्रास होतोय अशी ओरड केली जात आहे. त्यात काही प्रमाणात तथ्यही आहे. पण या बदलाला लोक सामोरं जाऊ लागलेत. किमान शहरात तरी तसं चित्रं दिसतंय. पिंपरी चिंचवड शहर ही त्याला अपवाद नाही.

पिंपरी चिंचवड मधलं हे भाजीचे दुकान असो, चहाचं दुकान असो,  पाणपट्टी असो एवढंच नाही तर गॅरेज असो किंवा नंबर प्लेटचं दुकान या सर्व ठिकाणी आता कॅशलेस व्यवहार सुरु झालेत. अगदी भाजी वाल्याने ही कार्ड पेमेंट आणि पेटीएमची सुविधा सुरु केलीय.. नोटाबंदीनंतर छोट्या व्यवसायिकांचं काय होणार अशी ओरड एकीकडं सुरु असताना या व्यावसायिकांनी मात्र त्यांच्या पातळीवर पर्याय शोधलाय आणि नोट बंदीच्या निर्णयाला सकारात्मक पद्धतीनं सामोरे जाण्यास सुरुवात केलीय. त्रास होतोय हा मान्य केलं जात असलं तरी निर्णयाने मोठा परिणाम झाला नसल्याचं ते सांगतात. 

नोट बंदीचा निर्णय किती चांगला किती वाईट याचं विश्लेषण होत राहिल. पण किमान या बदलामुळं कॅशलेस व्यवहारांकडे लोक वाळू लागलेत. पिंपरी चिंचवड शहर ही थोड्या वेगाने का होईना या बदलांचा स्वीकार करतेय हे ही तेवढंच खरे...!