शिर्डी : शिर्डीच्या साईबाबा संस्थानाच्या प्रसादालयात साईभक्तांच्या भोजनासाठी वापरण्यात येणाऱ्या तांदळामध्ये अळ्या आणि किडे आढळले आहेत. या निकृष्ट प्रतीच्या तांदळाचा वापर आता संस्थांननं थांबविला आहे. या प्रकरणी संस्थानचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र जाधव यांनी या संबधितांना नोटीसा बजावल्या असून तांदळाचा साठा असलेली गोडाऊन्स सील करण्यात आली आहेत.
प्रसादलयाचे वरिष्ठ आधिकारी रामराव शेळके यांच्या जागरुकतेमुळे हा प्रकार लक्षात आला आहे. वर्षभरापूर्वी सोना मसुरी ब्रँडचा हा तांदूळ खरेदी केला होता. तांदळात किडे-अळ्या आढल्याने निकृष्ट तांदूळ पुरवठा केल्याचे या निमित्ताने उघड झालेय. याबाबत साईभक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
१५०० क्विंटल खराब तांदूळ सिल करण्यात आला असून साईबाबा संस्थान व्यवस्थापनाने गोडावून सिल केलेय. शिर्डीच्या साईबाबा संस्थान मधील लाडू बनविण्यासाठी निकृष्ट तूप खरेदी प्रकरन गाजत असतानाच आता प्रसादलायत साईभक्तांच्या भोजनासाठी वापरन्यात येणाऱ्या तांदळामधे अळ्या , किडे आढळून आल्याने हा निकृष्ट प्रतीचा तांदूळ वापरण्याचे आता संस्थानाने थांबविले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.