पुणे: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत आठवणींना उजाळा दिला आहे.
बाळासाहेब राष्ट्रीय नेते होते. त्यापेक्षा मोठे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्रकार होते, असं पवार म्हणाले. ते आपले उत्तम मित्र होते. त्यांनी माझ्यावर व्यंगचित्र काढली तरी आम्ही एकमेकांशी हातचं राखून कधीच बोललो नाही, असं ते म्हणाले.
पुण्यामध्ये बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्र कलादालनाचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी हजेरी लावली.
गरवारे बालभवनच्या बाजुला हे कलादालन साकारण्यात आलं आहे. बाळासाहेबांची निवडक व्यंगचित्रं, 70 आसनी सभागृह,आर्ट गॅलरी, शहरातल्या महत्वाच्या ठिकाणांच्या छायाचित्रांचं दालन अशी या कलादालनाची वैशिष्ट्यं आहेत.