नाशिक : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आपल्याला पाच वर्षांसाठी सुटीवर पाठवलं आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. शरद पवारांना आजही शेतकरी शेतीशी संबंधित गोष्टींवर निवेदनं देत असतात.
यावर शरद पवार म्हणतात, "लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीला पराभव स्वीकारावा लागला. अद्याप अनेक मंडळी कृषी क्षेत्राशी संबंधित प्रश्नांचे निवेदन घेऊन भेटायला येतात, पण आपल्याकडे आता केंद्रीय कृषीमंत्री पद नाही", "महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी मला पाच वर्षे सुटीवर पाठविले आहे".
शरद पवार शनिवारी एका कार्यक्रमात बोलत होते.
केंद्रातील नव्या सरकारमधील केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी कांदा निर्यातीवर बंदी घालण्याची मागणी वाणिज्य मंत्रालयाकडे केली आहे. परंतु, निर्यात बंदीचा निर्णय शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक असून त्यास राष्ट्रवादी विरोध करेल, असं यावेळी शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.