पनवेल : सेंट जोसफ शाळेाचा अजब मनमानी कारभार समोर आला आहे. ज्या पालकांनी फी भरली नाही, त्यांना वकीलामार्फत कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.
फी भरा नाही तर कायदेशीर कारवाईला तयार राहा, असा उल्लेख या नोटीशीत करण्यात आला आहे. इतकंच नाही तर वकिलाची फी सुद्धा पालकांकडूनच वसूल करणार, असंही शाळेनं सांगितलंय.
पनवेलच्या सेंट जोसेफ शाळेनं पालकांना विश्वासात न घेता फि वाढवलीय. या फी वाढीला पालकांचा विरोध होता. पीटीएच्या बैठकीत फि संदर्भात निर्णय घ्या, तोपर्यंत फी भरु नका, असं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही पालकांना सांगितलं होते.