नाफेडच्या तूर खरेदीतील गैरव्यवहार उघड

नाफेडच्या तूर खरेदीत मोठ्या प्रमाणात घोळ आणि गैरव्यवहार होत असल्याचं उघड झालंय. अमरावतीच्या अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीतून सुमारे 90 क्विंटल बेवारस तूर जप्त करण्यात आलीय. 

Updated: Mar 25, 2017, 05:20 PM IST
नाफेडच्या तूर खरेदीतील गैरव्यवहार उघड title=

नाफेड : नाफेडच्या तूर खरेदीत मोठ्या प्रमाणात घोळ आणि गैरव्यवहार होत असल्याचं उघड झालंय. अमरावतीच्या अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीतून सुमारे 90 क्विंटल बेवारस तूर जप्त करण्यात आलीय. 

गेल्या दोन महिन्यांपासून तूर विक्रीसाठी बाजारात येत आहे. पहिल्या टप्प्यात नाफेडने विविध कारणं देत तूर खरेदी केली नसल्याने व्यापा-यांनी कमी भावात ही तूर खरेदी केली. 

अनेक तक्रारी आणि शेतक-यांनी आरडाओरड केल्यानंतर नाफेडने तूर खरेदी सुरु केली. यांत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी होत्या. व्यापारीच शेतक-यांच्या नावावर नाफेडला तूर देऊन नफा कमावत असल्याचे समोर आलं होतं. 

आता बाजार समितीमध्ये 90 क्विंटल बेवासर तूर जप्त केल्यानं नाफेडच्या तूर खरेदीत मोठा गैरव्यवहार होत असल्याचं सिद्ध झालंय.. एवढ्या तक्रारी आल्यानंतर आणि आता बेवारस तूर जप्त झाल्यानंतरही कुणावर कारवाई करण्यात आलेली नाही.