मुंबई : नाशिक-मुंबई महामार्गावरच्या कसारा घाटातल्या नवीन रस्त्याला तब्बल ४ फुटांचा तडा गेला आहे. त्यामुळे नाशिकहून मुंबईकडे येणारी वाहतूक सध्या एका मार्गानं सुरु करण्यात आली आहे.
कसारा घाटात आणि परिसरात तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाचं पाणी वेगाने येत असल्याने कसारा घाटात रस्ते खचण्याचा आणि मातीचा खच रस्त्यावर येण्याचा धोका वाढला आहे.
संध्याकाळी आणखी पावसाला सुरूवात झाली आहे. रेल्वेची वाहतूकही काल कसारा घाटातील माती ट्रॅकवर घसरल्याने काही तास बंद होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.