यामुळे पुण्यात पाणी पुरवठा झाला बंद...

पुणे महापालिकेचा पाणी पुरवठा जलसंपदा विभागाने थांबवला आहे. मंगळवारी रात्री आठपासून पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. 

Updated: Nov 30, 2016, 08:32 PM IST
यामुळे पुण्यात पाणी पुरवठा झाला बंद... title=

पुणे : पुणे महापालिकेचा पाणी पुरवठा जलसंपदा विभागाने थांबवला आहे. मंगळवारी रात्री आठपासून पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. 

कोणतीही सूचना , नोटीस किंवा पत्र न देता पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. अशी माहिती महापौर प्रशांत जगताप यांनी दिली आहे. पुणे महापालिका ठरवून दिलेल्या १२०० एमएलडी पेक्षा जास्त पाणी वापरत आहे. असं कारण, जलसंपदा विभागाने पाणी पुरवठा बंद करण्यासाठी दिलं आहे. 

जलसंपदा विभागाच्या या निर्णयाविरोधात महापौरांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जलसंपदा विभागाने पुनी पुरवठा पूर्ववत केन नाही तर, रस्त्यावर उतरवून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. 

दरम्यान, या निर्णयामागे आर्थिक गणितं असल्याचा आरोप देखील महापौरांनी केला आहे. पुण्यात २४ तास ( सामान पाणी पुरवठयाची ) पाणी पुरवठायची योजना प्रस्तावित आहे. त्यासाठी वॉटर मीटर बसवले जाणार आहेत. हि योजना २८०० कोटी रुपयांची आहे. त्यातील २२५० कोटी रुपये महापालिका कर्ज रोखे उभारण्याचा प्रस्ताव होता. मात्र , मंगळवारी दुपारी कर्ज रोख्यातून २२५० कोटी रुपये उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने फेटाळला. 

हा प्रस्ताव फेटाळल्या नंतर काही तासातच जलसंपदा विभागाने पाणी पुरवठा बंद केला. त्यामुळं वॉटर मीटर योजना आणि पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय यामध्ये संबंध असल्याचा आरोप महापौर प्रशांत जगताप यांनी केला आहे. वॉटर मीटर योजना महापालिकेनं मंजूर करावी यासाठीच पाणी पुरवठा बंद करून दबाव आणला जात आहे. असा आरोप त्यांनी केला आहे.