नाशिक : पावसाने पाठ फिरवल्यामुळे येवला बाजार समितीत कांद्याची आवक घटलीय. यामुळे कांद्याचे भाव गगनाला भिडत आहेत.
किरकोळ बाजार कांद्याचे भाव किलो मागे पन्नास रूपयांच्या वर जाण्याची शक्यता आहे. मंगळवारी येवला बाजार समितीत प्रति क्विंटल कमाल ३९६० रूपये तर किमान ३५५१ रूपये भाव मिळाला. कांद्याचा सरासरी भाव आज २२७५ रूपये इतका होता.
तर लासलगाव बाजार समितीत प्रति क्विंटल कमाल ३७८२ रूपये तर किमान ३६०० रूपये इतका होता. कांद्याची आवक कमी झाल्याने आठवडाभरात कांद्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.