माळीणमध्ये नवी पहाट, गावाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

नव्या माळीण गावाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. नवीन आमडेमधील जागेत उभारलेल्या घरांचं माळीणवासियांना लोकार्पण केलं गेलं.

Updated: Apr 2, 2017, 05:08 PM IST
माळीणमध्ये नवी पहाट, गावाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण  title=

माळीण : नव्या माळीण गावाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. नवीन आमडेमधील जागेत उभारलेल्या घरांचं माळीणवासियांना लोकार्पण केलं गेलं. 30 जुलै 2014 ला पुणे जिल्ह्यातल्या माळीण गावावर डोंगरकडा कोसळूण संपूर्ण गाव दरडीखाली गाडलं गेलं होतं. या दुर्घटनेत 151 लोकांचा मृत्यू झाला होता.

या घटनेला अडीच वर्ष पूर्ण झाली आहेत. गेल्या अडीच वर्षात हे गाव इथून जवळच असलेल्या आमडेमध्ये पुनर्वसित करण्यात आलं. आमडेमध्ये ग्रामस्थांसाठी नवी घरं, नवी शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत, गुरांचा गोठा, समाज मंदिर बांधण्यात आलंय.  

या नव्या माळीणच्या लोकार्पणाचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांबरोबर केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, विष्णु सावरा, गिरीष बापट उपस्थित होते.

असं आहे नवीन माळीण गाव