पुणे: पुण्यातल्या शिरुर इथल्या शासकीय बालगृहातल्या 2 अल्पवयीन मुलींवर तिथल्याच क्लर्क आणि त्याच्या मुलानं बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. याप्रकरणी बालगृहाचा क्लर्क शब्बीर बाले आणि त्याचा मुलगा बबलूला पोलिसांनी अटक केलीय.
शब्बीर बाले हा 2008पासून याठिकाणी कामाला असून तिथल्याच कर्मचारी निवासात तो राहतो. या संस्थेत राहून सहावी आणि सातवीत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर या नराधम बाप-बेट्यांनी सलग सात महिने बलात्कार केल्याचं उघड झालंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.