ठाण्यात आणखी एक वळवळतंय - राज ठाकरे

मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांच्यावर नाव न घेता टीका केली. बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरील कथित टिकेविषयी राज ठाकरे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली.

Updated: Aug 10, 2015, 09:08 PM IST
ठाण्यात आणखी एक वळवळतंय - राज ठाकरे title=

ठाणे : मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांच्यावर नाव न घेता टीका केली. बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरील कथित टिकेविषयी राज ठाकरे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली.

याविषयी बोलतांना राज ठाकरे म्हणाले, बाबासाहेब पुरंदरे यांचं वय ९२-९३ वर्ष आहे, ज्यांनी अख्खी हयात शिवछत्रपतींशिवाय कोणताही विचार केला नाही, त्यांना एकेरी हाका मारता, लाज वाटत नाही या लोकांना आपण काय बोलतोय, कुणासाठी काय बोलतोय.

शरद पवारांना झालंय काय?
"शरद पवारांना झालंय काय?" असा सवाल करतांना राज ठाकरे म्हणाले, "जाणता राजा म्हणे जाती पातीच्या राजकारणला खतपाणी घालता".

पुढे राज म्हणाले, "हा राष्ट्रवादी नावाचा पक्ष जेव्हा जन्माला आला, तेव्हा हे सर्व महाराष्ट्रात हे सर्व सुरू झालं, आधी होतं पण हा पक्ष आल्यापासून फारच उघड सुरू केलंय त्यांनी."

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.