लोणावळ्यात पाऊस, भूशी डॅमवर गर्दी

पावसाळ्यात युवकांचं आवडतं ठिकाण असलेल्या लोणावळात चांगलाच पाऊस झाला आहे. लोणावळ्याला मोसमी पावसाने चांगलाच तडाखा दिला आहे.

Updated: Jul 3, 2016, 08:56 PM IST
लोणावळ्यात पाऊस, भूशी डॅमवर गर्दी title=

लोणावळा : पावसाळ्यात युवकांचं आवडतं ठिकाण असलेल्या लोणावळात चांगलाच पाऊस झाला आहे. लोणावळ्याला मोसमी पावसाने चांगलाच तडाखा दिला आहे.
शनिवार आणि रविवारी लोणावळेकरांना पावसाने चांगलेच झोडपले. 

रविवारी  सकाळी चोवीस तासांत २१४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर ४८ तासांत ३७७ मिलिमीटर इतक्‍या पावसाची नोंद झाली आहे. पावसाची संततधार गेले दोन दिवस  सुरू असल्याने जनजीवन विस्कळित झाले. 

शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे रात्रीच भुशी धरण भरून वाहू लागले. तरुण, तरुणींसह अबालवृद्धांनी ओले चिंब होत भिजण्याचा आनंद लुटला. पर्यटकांचे सर्वाधिक पसंतीचे केंद्र असलेले भुशी धरण भरल्याने लोणावळेकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.  

पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र असलेले भुशी धरण तुडुंब भरल्याने ओसंडून वाहू लागले. वर्षाविहारासाठी आलेल्या पर्यटकांना उत्साह अनावर झाला होता.