नवी मुंबईतील रेल्वे स्टेशनदरम्यान ट्रॅकवर जिलेटीनच्या ४ कांड्या

तळोजा-नावडा रेल्वे स्टेशनदरम्यान ट्रॅकवर जिलेटीनच्या ४ कांड्या सापडल्या आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 9, 2017, 10:43 PM IST
नवी मुंबईतील रेल्वे स्टेशनदरम्यान ट्रॅकवर जिलेटीनच्या ४ कांड्या title=

नवी मुंबई : रेल्वेचा अपघात घडवून घातपात करण्याच्या काही घटना पुढे येत आहेत. काही दिवसांपासून रेल्वे ट्रॅकवर लोखंडी तुकडे सापडण्याचे प्रकार समोर आले आहेत. तळोजा-नावडा रेल्वे स्टेशनदरम्यान ट्रॅकवर जिलेटीनच्या ४ कांड्या सापडल्या आहेत. याबाबत तळोजा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मध्य रेल्वे मार्गावर दिवा येथे तर कळंबोली येथे रेल्वे ट्रॅकवर मोठे लोखंडी तुकडे ठेवल्याचे आढळून आले. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या दक्षतेमुळे कोणताही अपघात झाला नाही. दरम्यान, हा घातपाताचा कट असल्याचे म्हटले जात आहे.

आज तळोजा आणि नावडा स्टेशन दरम्यान रेल्वे रुळावर जिलेटीनच्या कांड्या सापडल्याने परिसरात खळबळ माजली. मात्र पोलिसांनी यासंदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही. तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली केली आहे. याचा तपास सुरु आहे.