राहुल गांधी 'छोटा भीम'चे चाहते!

ज्या पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष छोटा भीम कार्टुनचे चाहते आहेत, त्या पक्षाच्या नेत्यांकडून नेमकी अपेक्षा तरी काय करणार असा खोचक टोला संसदीय कामकाज मंत्री विनोद तावडे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना लगावला आहे.

Updated: Dec 5, 2016, 03:56 PM IST
राहुल गांधी 'छोटा भीम'चे चाहते! title=

नागपूर : ज्या पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष छोटा भीम कार्टुनचे चाहते आहेत, त्या पक्षाच्या नेत्यांकडून नेमकी अपेक्षा तरी काय करणार असा खोचक टोला संसदीय कामकाज मंत्री विनोद तावडे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना लगावला आहे.

राज्य सरकार हे डोरेमॉन आहे आणि ते जनतेचा नोबिता म्हणून वापर करत असल्याची टीका विखे पाटील यांनी केली होती. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विखे पाटील यांना प्रत्युत्तर दिलं होतं. आम्हाला डोरेमॉन म्हणणारे मोगली आहेत, कारण नगरपालिका निवडणुकांमध्ये कमल खिला है, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला होता. यानंतर आता विनोद तावडेंनीही यावरून विखे-पाटील यांना प्रत्युत्तर दिलं आहे.