ठाणे : भाजपच्या ठाण्यातल्या इच्छुकांच्या नाराजीला आज हिंसक वळण लागलंय.
आज सकाळी वागळे इस्टेटमधल्या नाराजांची खोपट कार्यालयाबाहेर जोरदार हाणामारी झालीय. यात एक कार्यकर्ता जखमी झालाय.
वॉर्ड क्र १८ म्हणजे वागळे इस्टेट परिसरच्या इच्छुकांमध्ये कालपासूनच तणाव वाढत होता. या प्रमुख्यानं संजय घाडीगावकर समर्थक आणि विरोधकांमध्ये हा वाद झाला.
संजय घाडीगावकर यांनी काही महिन्यांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण काल अचानक घाडीगावकर आणि त्यांच्यासोबत तिकीट मिळालेल्या सहा जणांनी भाजपला रामराम ठोकला होता.
तिकडे ठाण्यातल्याच नौपाड्यात भाजपच्या इच्छुक महिला उमेदवार विशाखा कणकोशे यांनी काल खोपटच्या मध्यवर्ती कार्यालयात रवींद्र चव्हाण आणि संदीप लेले यांच्या गोपनीय बैठकीत गोंधळ घातला. भाजपनं पैसे घेऊन तिकीटं दिल्याचा आरोप त्यांनी केलाय.