पुणे : पाकिस्तानी कलाकार आतिफ अस्लम याचा पुण्यात होणारा कार्यक्रम उधळून लावण्याची धमकी शिवसेनेनं दिल्यानंतर राष्ट्रवादीनं सेनेच्या भूमिकेला विरोध करत 'हा कार्यक्रम होणारच' अशी भूमिका घेतलीय.
भारतात दहशतवादी कारवाया करून अस्थिरता निर्माण करणाऱ्या पाकिस्तानातल्या कलाकाराचा कार्यक्रम रद्द करण्याची, मागणी चित्रपट सेनेनं केलीय.
राष्ट्रवादीनं शिवसेनेच्या या भूमिकेला विरोध केलाय. कार्यक्रमाला आडकाठी होणार असेल तर आम्हीही रस्त्यावर उतरू, असा इशारा राष्ट्रवादीनं दिलाय.
पुण्यात २५ एप्रिलला होणारा एक कार्यक्रम उधळून लावण्याची धमकी शिवसेनेनं दिलीय. हा कार्यक्रम पाकिस्तानी कलाकारांचा आहे, असं शिवसेनेनं म्हटलंय. हा कार्यक्रम रद्द झाला नाही तर तो उधळून लावला जाईल, असा इशारा शिवसेसेनं दिलाय.
पाकिस्तानी कलाकार आतिफ अस्लम याच्या गाण्याचा कार्यक्रम अमानोरा पार्क मध्ये होणार आहे. अंजनेय साठे ग्रुप आणि एक्सटसी बिझनेस सोल्युशन्सतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.