मायेचं नातं! खारुताईची पिल्लं पितात मांजरीचं दूध!

खारुताई आणि मांजर याचं अगदी विळ्या भोपल्याच नातं मात्र सिंधुदुर्गात एका मांजरानं या नात्याला फाटा फोडलाय.

Updated: Apr 20, 2015, 11:11 PM IST
मायेचं नातं! खारुताईची पिल्लं पितात मांजरीचं दूध! title=

सिंधुदुर्ग: खारुताई आणि मांजर याचं अगदी विळ्या भोपल्याच नातं मात्र सिंधुदुर्गात एका मांजरानं या नात्याला फाटा फोडलाय.

माणगावातल्या मारिया डिसोझा यांचं हे घर पंचक्रोशितल्या नागरिकांसाठी कौतुकाचा विषय ठरतंय. त्याला कारणही तसंचं आहे. कारण त्यांच्या घरात डोकावलं तर तुम्हीही चक्रावून जाल. मारिया यांच्या घरातली ही मनीमाऊ चक्क खारुताईच्या पिलांना आपलं दूध पाजतेय. घराशेजारच्या जांभळाच्या झाडावर खारुताईनं खरटं बांधून या चिमुकल्या पिलांना जन्म दिला. मात्र अचानक खारुताई मरण पावली आणि पिलं अनाथ झाली. मारिया यांनी या पिलांना आसरा दिला पण प्रश्न होता तो त्यांच्या दुधाचा... आणि तो प्रश्न सोडवला घरातल्या मांजरीनं.

खार आणि मांजर यांचा छत्तीसचा आकडा असतो... मांजरीच्या भक्षात उंदरांप्रमाणे खारीचाही समावेश होतो... इथं मात्र वैरभावनेवरही मातृत्वानं मात केलीये.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.