पुण्यात संगीत मेजवानी, वसंतोत्सव कार्यक्रम जाहीर

पुण्यात यंदा १६ ते १८ जानेवारी दरम्यान वसंतोत्सव कार्यक्रम रंगणार आहे. अभिजात संगीतासह गझल, फ्युजन, आणि सुफी संगीताची मेजवानी यात रसिकांना मिळणार आहे.

Updated: Jan 6, 2015, 07:34 PM IST
पुण्यात संगीत मेजवानी, वसंतोत्सव कार्यक्रम जाहीर title=

पुणे : पुण्यात यंदा १६ ते १८ जानेवारी दरम्यान वसंतोत्सव कार्यक्रम रंगणार आहे. अभिजात संगीतासह गझल, फ्युजन, आणि सुफी संगीताची मेजवानी यात रसिकांना मिळणार आहे.

पंडित विश्वमोहन भट यांच्या वीणा वादनानं कार्यक्रमाला सुरुवात होईल. सोबतच सुरेश वाडकरांचं गझल गायन आणि दलेर मेहंदींच्या सुफी गायनासह, इतर कलाकारांच्याही कलेचा आनंद रसिकांना अनुभवता येणाराय. या महोत्सवाचं यंदाचं आठवं वर्ष आहे.

दरम्यान, डॉक्टर सुरेश चांदवणकर आणि डॉक्टर नाथराव नेरळकर यांना, यंदाच्या वसंतराव देशापांडे स्मृती सन्मान पुरस्कारानं या कार्यक्रमात गौरवलं जाईल. तर वसंतराव देशपांडे उदयोन्मुख पुरस्कार, सरोदवादक सारंग कुलकर्णी यांना प्रदान करण्यात येईल.

विशेष म्हणजे यंदा प्रथमच नागपूरमध्ये वसंतोत्सव कार्यक्रम होणार आहे. ८ ते १० जानेवारी दरम्यान नागपुरात हा कार्यक्रम होईल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.