पुणे - बंगळुरु महामार्गावरील अपघातात ३ ठार, ३० जखमी

पुणे - बंगळुरु महामार्गावर खासगी बसला भीषण  अपघात  झाला. या अपघातात ३ ठार तर ३० जण जखमी झालेत. धारवाडवरुन पुण्याला लग्नासाठी ही बस जात होती. मृतांत हंडगल कुटुंबीयांचा समावेश आहे.

Updated: May 7, 2015, 08:50 AM IST
पुणे - बंगळुरु महामार्गावरील अपघातात ३ ठार, ३० जखमी title=

कोल्हापूर : पुणे - बंगळुरु महामार्गावर खासगी बसला भीषण  अपघात  झाला. या अपघातात ३ ठार तर ३० जण जखमी झालेत. धारवाडवरुन पुण्याला लग्नासाठी ही बस जात होती. मृतांत हंडगल कुटुंबीयांचा समावेश आहे.

पुणे बंगळुरु महामार्गावर किणी जवळ  दोन खासगी बसमध्ये हा अपघात झाला. या अपघातील जखमींवर कोल्हापुरतील सी.पी.आर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

मृतांची नावे. आशाभी हंडगल (७०),  शाहीन महमद हंडगल (१५) , शाहिदा हंडगल (२०) हे धारवाडचे राहणारे असून पुण्याला लग्नाला जात आसताना हा अपघात झाला.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.