मुख्यमंत्री तुम्ही सुद्धा, ११ महिन्यांत पुणे अतिरिक्त आयुक्तांची उचलबांगडी

स्वच्छ प्रतिमेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आमदारांच्या दबावाला बळी पडलेत. वक्तशीर कारभार करणारे आणि स्वच्छ प्रतिमा जपणारे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांची केवळ ११ महिन्यांत दुसऱ्यांदा बदली करण्यात आली.

Updated: Jan 14, 2015, 02:58 PM IST
मुख्यमंत्री तुम्ही सुद्धा, ११ महिन्यांत पुणे अतिरिक्त आयुक्तांची उचलबांगडी title=

पुणे : स्वच्छ प्रतिमेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आमदारांच्या दबावाला बळी पडलेत. वक्तशीर कारभार करणारे आणि स्वच्छ प्रतिमा जपणारे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांची केवळ ११ महिन्यांत दुसऱ्यांदा बदली करण्यात आली.

पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांची क्रीडा व युवक कल्याण खात्याचे आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. वक्तशीरपणामुळे पालिकेच्या काही खात्यांना शिस्त लावण्यात बकोरिया यांनी पुढाकार घेतला. बकोरिया यांची वर्षाच्या आतच बदली करण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीही दबावाला बळी पडल्या दिसत आहे.

बकोरिया यांनी आमदारांच्या मर्जीतील एका ठेकेदारावर कारवाई करत त्याला काळ्या यादीत टाकण्याची शिफारस केली होती. त्यामुळे आपले राजकीय वजन वापरून आमदारांनी ही बदली केल्याची कुजबूज दबक्या आवाजात पालिकेत सुरु आहे.

बकोरिया हे प्रामाणिक आणि कुठल्याही दबावाला बळी न पडता काम करणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी एक. अशाच बकोरियांना राजकारणाचा बळी पडावे लागेल. गेल्या अकरा महिन्यांच्या कार्यकाळात दुसऱ्यांदा बदली झाली आहे.

फेब्रुवारी २०१४ पर्यंत बकोरिया हे नंदुरबारचे जिल्हाधिकारी होते. तेव्हा त्यांनी शहरातील अनेक अवैध बांधकामांवर कारवाई सुरु केली. अनेक जमीन व्यवहार रद्द करण्याच्या हालचाली सुरु केल्या. यामुळे राजकीय नेत्यांनी अवघ्या दीड वर्षांच्या कार्यकाळात त्यांची बदली करण्यास भाग पाडले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.