मुंबई : वेगळ्या विदर्भाची चळवळ पेट घेणार असं वाटत असतानाच, या चळवळीतील दोन मोठ्या मोठ्या नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. या आंदोलनाबाबतच्या काही मुद्यांवर विदर्भवादी नेते अॅड. श्रीहरी अणे यांच्याशी मतभेद असल्याचे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते वामनराव चटप यांनी म्हटलयं. त्यामुळे चळवळ सुरु होण्याच्या आधीच निष्प्रभ ठरण्याची चिन्हे आहेत.
विदर्भ मिळवण्याकरता निवडणुकीचा मार्ग आपल्याला मान्य नसल्याचे चटप यांनी म्हटलं आहे. वेगळ्या राज्या करता आपण निवडणूक लढणार असल्याची घोषणा अणे यांनी केली होती. विदर्भवादी नेते श्रीहरी अणे यांनी निवडणुकीच्या माध्यमातून अर्थात राजकीय मार्गाने विदर्भ मिळविण्याचा निर्धार केला आहे़. तर, विदर्भ राज्य आंदोलन समितीने मात्र आंदोलनाच्या माध्यमातूनच विदर्भ मिळवू असे सांगत अणे यांच्या भूमिकेला विरोध केला आहे़.