सातारा : मराठा क्रांती मूक मोर्चाला साता-यात सुरुवात झाली आहे. प्रचंड गर्दी या मोर्चाला झाली आहे. पुणे बंगळुरू महामार्गावर वाहनांच्या सुमारे 10 किमीपर्यंत रांगा लागल्यात. मोर्चासाठी येणारी वाहनंही या वाहतूक कोंडीत अडकलीत. दरम्यान मोर्चात उदयनराजे भोसले, पालकमंत्री विजय शिवतारेसह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण देखील सामील झाले आहेत.
मोर्चासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झालीय. सुरक्षेसाठी ४००० पोलीस तैनात करण्यात आले आहेत. वीस ठिकाणी cctv कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सातारा जिल्हा परिषद मैदानातून मोर्चाला सुरुवात झाली आहे. कराड, रहिमतपूर, कोरेगाव, खंडाळा, वाई, महाबळेश्वर, मेढा आणि परळी या भागांसह पुण्याकडून काही लोक या मोर्चात सहभागी झालेत. जिल्हापरिषद मैदान, एसटी स्टॅंडमार्गे गणपत तपासेमार्गे पुढे राधिका थिएटर, समर्थ थिएरपासून मोती चौक राजपथ मार्गे नरपरिषद आणि पोवई नाका असा मोर्चाचा मार्ग असणार आहे.