मद्य निर्मिती कारखाना उद्ध्वस्त करणं पोलिसांना पडलं महागात

अवैध दारु निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त करायला गेलेल्या चार पोलिसांवर स्पिरीट सांडल्यानं ते गंभीररीत्या भाजल्याची घटना धुळ्यात घडलीय. उल्लेखनीय म्हणजे, पोलीस भाजले तरी गुन्हा दाखल करायला झालेला विलंबामुळे अनेकांचं लक्ष या घटनेकडे वेधलं गेलंय. 

Updated: Dec 31, 2015, 01:36 PM IST
मद्य निर्मिती कारखाना उद्ध्वस्त करणं पोलिसांना पडलं महागात  title=

धुळे : अवैध दारु निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त करायला गेलेल्या चार पोलिसांवर स्पिरीट सांडल्यानं ते गंभीररीत्या भाजल्याची घटना धुळ्यात घडलीय. उल्लेखनीय म्हणजे, पोलीस भाजले तरी गुन्हा दाखल करायला झालेला विलंबामुळे अनेकांचं लक्ष या घटनेकडे वेधलं गेलंय. 

बोरी नदीकिनारी असलेला बनावट मद्य निर्मित कारखाना उध्वस्त करणे पोलिसांना चांगलेच महागात पडले आहे. धुळे जिल्ह्यातल्या शिरुड तालुका पोलिस ठाण्यातले चौघं जण बनावट मद्य निर्मितीसाठी लागणारं स्पिरीट अंगावर पडल्यानं भाजलेत. त्याच्यांपैकी आनंदा माळी हे गंभीर जखमी आहेत, अशी माहिती प्रभारी पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी दिलीय. 

नाशिकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान चार पोलीस भाजले तरी गुन्हा दाखल करायला झालेला विलंबामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात.

पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न... 
पोलीस ज्या ठिकाणी भाजले त्या ठिकाणी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आणि तो काही प्रमाणात यशस्वीही झालाय. इतकंच नव्हे तर ही दुर्घटना नसून घातपात आहे अशी चर्चाही दबक्या आजावत सुरु आहे. या दुर्घानानेमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेलाय. पोलिसांसोबत असा घातपात घडू शकतो तर सामान्य माणसाचे काय असा प्रश्न नागरिकाना पडला आहे.

 उत्पादन शुल्क विभागाने तर या घटनेची साधी दाखलाही घेतलेली नाही. गले लठ्ठ पगार कमावारणार उत्पादन शुल्क विभाग तर आपला या घटनेशी काही संबंध अशा अविर्भावात वावरत आहेत.