पिंपरी चिंचवडमधील लक्ष्यवेधी लढत, विक्रांत लांडे विरूद्ध सारंग कामतेकर

पिंपरी चिंचवड मध्ये अजून उमेदवार निश्चित झाले नसले तरी एक लढत सार्वधिक चर्चेची होण्याची शक्यता आहे... कोणती आहे ही लढत... पाहुयात एक स्पेशल रिपोर्ट

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 23, 2017, 11:00 PM IST
पिंपरी चिंचवडमधील लक्ष्यवेधी लढत, विक्रांत लांडे विरूद्ध सारंग कामतेकर  title=

 कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड मध्ये अजून उमेदवार निश्चित झाले नसले तरी एक लढत सार्वधिक चर्चेची होण्याची शक्यता आहे... कोणती आहे ही लढत... पाहुयात एक स्पेशल रिपोर्ट

पिंपरी चिंचवडचे माजी आमदार विलास लांडे यांचा मुलगा विक्रांत याचं राजकीय लाँचिंग महापालिका निवडणुकीत करतायेत. त्यासाठी भोसरीमधल्या प्रभाग क्रमांक ८ मध्ये त्यांनी तयारी सुरु केलीय... पण याचं प्रभागात भाजपचे लॅपटॉप मॅन शहराध्यक्ष लक्ष्मण जगतापांचा ब्रेन म्हणून काम करत असलेले भाजप सरचिटणीस सारंग कामतेकर निवडणुकीची तयारी करतायत. त्यामुळे संपूर्ण शहराचं या लढतीकडे लक्षं लागलंय... 

ही लढत आणखी एका कारणाने लक्षवेधी ठरणारेय...विलास लांडे हे लक्ष्मण जगताप यांचे जवळचे मित्र आहेत, तर सारंग कामतेकर त्यांचा सध्याचा ब्रेन... ! आता या लढतीत ते काय भूमिका घेणार हे पाहणं ही रंजक ठरणार आहे...! एकूणच काय तर शहरातली ही सर्वाधिक रंजक अशी ही लढाई आहे...!