परभणी : परभणी शहरातल्या बस स्थानका समोरच मुख्य रस्त्यावर चालणा-या दोन कुंटणखान्यांवर कोतवाली पोलिसांनी धाड टाकली. यात पोलिसांनी 22 जणांना ताब्यात घेतलं, तर 16 पीडितांची सुटका केली.
शिवाय 4 ग्राहकांसोबत हा कुंटणखाना चालवणा-या दोन महिलांवरही पोलिसांनी पिटा कायद्याद्वारे गुन्हा दाखल केला.
अनेक दिवसांपासून या ठिकाणी राजरोसपणे देहविक्रीचा व्यवसाय सुरु होता. यात बिहार, मध्य प्रदेशसह महाराष्ट्रातल्याही महिला सहभागी होत्या.