रत्नागिरी : बहुचर्चीत मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं भूमिपूजन येत्या शुक्रवारी होणार आहे.
रत्नागिरीतील निवळी येथे होणाऱ्या भूमिपूजन कार्यक्रमात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. गेल्या काही वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाची मागणी होत होती.
अखेर त्याला मुहूर्त स्वरुप प्राप्त झाले आहे. यामुळे युतीच्या सरकारने दिलेलं वचन पूर्ण करत असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष सुरेंद्र तथा बाळ माने यांनी सांगितले. संपादीत केल्या जाणाऱ्या जमिनिला रेडी रेक्नरच्या पाच पट रक्कम मिळणार असल्याची माहिती, बाळ माने यांनी दिली.
पाहा व्हिडिओ :