पंढरपूरचे माजी नगरसेवक नामदेव भूइटेंची हत्या

पंढरपूरचे काँग्रेसचे माजी नगरसेवक श्रीनिवास उर्फ नामदेव भूइटे यांची हत्या करण्यात आली.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 18, 2017, 02:14 PM IST
पंढरपूरचे माजी नगरसेवक नामदेव भूइटेंची हत्या title=

सांगली : पंढरपूरचे काँग्रेसचे माजी नगरसेवक श्रीनिवास उर्फ नामदेव भूइटे यांची हत्या करण्यात आली. धार- धार शस्त्रानं वार करुन त्यांची हत्या करण्यात आली. 

भुईटे यांच्या डोक्यावर आणि चेह-यावर कोयत्यानं वार केले आहेत. तर हाताची बोटं ही तोडली आहेत. हत्या करण्यासाठी वापरलेले दोन कोयतेही जप्त करण्यात आलेत. 

मिरज-पंढरपुर रोडवरील खरशिंग फाटा जवळील ही घटना घडली. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर फरार झाले त. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटना स्थळावर दाखल झालेत. हल्लेखोरांचा शोध मिरज ग्रामीण पोलिस घेत आहेत.