चंद्रपूर : किनारपट्टीचा भाग वगळता संपूर्ण राज्यभर उन्हानं कहर केला आहे. राज्यातील अनेक भागात पा-यानं चाळीशी पार केली आहे. सलग दुसऱ्या दिवशीही चंद्रपूर विदर्भातील सर्वात उष्ण शहर ठरले.
चंद्रपूरमध्ये सोमवारी ४५.९ अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. त्याखालोखाल अकोल्यात ४५.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तर नागपुरात पारा ४४.० अंशावर होता.
संपूर्ण विदर्भात १५ एप्रिल पासून पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे... चंद्रपूर मध्ये नोंदविण्यात आलेले तापमान या मोसमातील सर्वाधिक तापमान ठरलं.