विरोधकांची कर्जमाफीच्या मुद्यावर शिवसेनेवर टीका

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मीठ खाल्लं त्यामुळे शिवसेनेने कर्जमाफीच्या मागणीला जय महाराष्ट्र केला अशी टीका विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

Updated: Apr 17, 2017, 09:55 AM IST
विरोधकांची कर्जमाफीच्या मुद्यावर शिवसेनेवर टीका title=

जळगाव : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मीठ खाल्लं त्यामुळे शिवसेनेने कर्जमाफीच्या मागणीला जय महाराष्ट्र केला अशी टीका विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावरील विमान प्रवास बंदी उठविण्यासाठी शिवसेनेचे खासदार पार्लमेंटमध्ये धावून गेले, पण कार्जमाफीसाठी शिवसेनेचे खासदार प्रयत्न करताना दिसले नाहीत. केंद्रात अर्थमंत्र्यांची भेट घेऊन कर्जमाफीची मागणी शिवसेनेच्या नेत्यांनी केली असती तर आनंद वाटला असता असेही विखे पाटील म्हणाले. शेतकरी संघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात पारोळा इथे झालेल्या जाहीर सभेत विखे पाटलांनी विरोधकांवर टीकेची झोड उठवली.

पाहा व्हिडिओ